औरंगाबाद : शिवना तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या शिवना (ता.सिल्लोड) येथील ग्रामदैवत शिवाई देवीचा यंदाचा वार्षिक यात्रोत्सव, कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. मंदिर व्यवस्थापन समितीने शुक्रवारी (ता.२३) ऑनलाईन घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवना तलाठी कार्यालयात ग्रामविकास आधिकारी के.बी.दौड, अजिंठ्याचे सहाय्यक निरीक्षक गिरिधर ठाकुर, तलाठी विशाल शेलकर यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
यात्रोत्सवासोबतच बालाजी महाराजांच्या ५ दिवस चालणा-या जेवणावळी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भरणारी यात्रा, वगदि मिरवणूक, रेवड्यांची ऊधळन, बारा गाडे ओढण्याचा नवस पेâडने, तसेच पाच दिवसांच्या पंगतीनंतर गावातून भल्या पहाटे निघणारी देवीची स्वारीही रद्द करण्यात आली आहे.
कोरोना संदर्भात शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करीत सोमवारी (ता.२६) यजमान आणि मोजक्या ब्राह्मणवृंदांच्या उपस्थितीत सायंकाळी मंदिरात होम हवन व पूजा विधी होणार असल्याने भाविकांनी परिस्थितीचे भान ठेऊन घरुनच जगदंबेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनानेही सर केले ‘माउंट एव्हरेस्ट’! नॉर्वेचा गिर्यारोहक पॉझिटिव्ह
- शहरात तुटवडा, मनपाने मागवले १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन!
- पीपीई कीट घालत कोव्हीड हॉस्पिटलची पाहणी करणाऱ्या खासदार मुंडे यांना कोरोनाची लक्षणे
- भाजपच्या विनाशाला CBI ची टोळधाडच कारणीभूत ठरणार; मिटकरींच भाकीत
- जळकोटमध्ये डेडिकेटेड कोविड रुग्णालयाची नुसतीच घोषणा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

