Share

‘हिंदुत्वावरून फडणवीस यांचा शिवसेनेला पुन्हा टोला; म्हणाले…

Published On: 

नाशिक : २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाला डावलून शिवसेना पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय काँग्रेस बरोबर जाऊन महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन केली. प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यात हिंदूंच्या  मतांची बेरीज व्हावी आणि मुळातच हिंदुत्वाला फायदा व्हावा म्हणून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षांची युती केली. परंतु २०१९ मध्ये राज्यातील राजकीय गणितामुळे शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय काँग्रेस पक्षासोबत जायचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात एक नवीनच समीकरण अस्तित्वात आले.

शिवसेनेने काँग्रेस प्रणित धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत जायचा निर्णय घेतल्यामुळे हिंदुत्व कोणाचं आणि हिंदुत्वाच राजकरण कोण करणार यावरून रोज राजकरण चालू आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना हिंदुत्व कोणाचं आणि त्यावर हक्क कोणाचा यावरून रोज टोलेबाजी करायला विसरत नाहीत. त्यातच आज राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला हिंदुत्वावरून पुन्हा टोला लगावला आहे.  नाशिक महानगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकवा असे आवाहन करतनाच  भगव्याची जबाबदारी आता फक्त भाजपवर आहे. बाकीचे काय करत आहेत हे तुम्ही पाहतच आहात, असे म्हणत शिवसेनेवर  हिंदुत्वावरून पुन्हा हल्लाबोल केला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर जेव्हा घरोबा केला आहे, तेव्हापासून शिवसेनेला हिंदुत्व नकोसे वाटायला लागले आहे असेही आज बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून देवेंद्र फडणवीस आज नाशिक शहरात आले होते.

मुंबई शहराच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मध्यंतरी भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वावरून तोला लगावला होता आणि शिवसेनेचेच हिंदुत्व खरे आहे असा मुद्दा पण अधोरेखित केला होता. यावरूनच देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने आता हिंदुत्व सोडले असून हिंदुत्व आता फक्त आपलीच म्हणजेच भारतीय जनता पक्षाची जबाबदारी असल्याची टीका शिवसेनेवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!