जालना: राज्यातील लसीकरण राहिलेल्या नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावं. समाजाला सुरक्षित ठेवायचं असेल तर लसीकरण करून घेणं गरजेचं असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे ते जालन्यात बोलत होते. लसीकरण केल्यास चौथ्या लाटेचा धोका नाही, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.
निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून निर्बंध कमी केले जातील मात्र मास्क मुक्ती सध्या नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातील अतिरिक्त उसाबाबत बैठक झाली असून साखर आयुक्तालय याबाबत योग्य निर्णय घेईल.पण शेतकऱ्यांनी धीर धरुन सहकार्य करावे. सर्व शेतकऱ्यांची ऊस तोडणी होईल असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
‘सत्ताधाऱ्यांनी ३ कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम केलंय’ – गोपीचंद पडळकर
‘फडणवीस यांच्यावर बोलून वेळ वाया घालवणार नाही’ – आदित्य ठाकरे
‘संजय राऊत यांना सल्ला देण्याचे धाडस परमेश्वरही करणार नाही’ – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

