Share

यशोमती ठाकूर म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस जबाबदार नेते आहेत, पण….

Published On: 

अमरावती: अमरावतीमध्ये झालेल्या हिंसचारामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील वातावरण बिघडले होते. अमरावती येथील हिंसाचार घडून गेला आता राज्य सरकारने तेथील परिस्थिती आटोक्यात आणली असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. वातावरण शांत झाले असले तरी भाजप आंदोलन का करत आहे, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

आमरावतीच्या पालकमंत्री तसेच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी भाजपच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. यशोमाती ठाकूर म्हणाल्या, आमरावतीची जनता द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही. भाजपने अमरावतीमधील वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न देखील करू नयेत, असे स्पष्ट शब्दात ठाकूर यांनी भाजपला सुनावले आहे. जे घडून गेले त्यावर आता राजकारण करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, असं देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या.

महाराष्ट्राचे सरकार कुठल्याही प्रकारे शांतता भंग होऊ देणार नाही. आमरावतीची जनता सुज्ञ आहे, ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास देखील पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बद्दल देखील त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नेते आहेत, मात्र त्यांना मतांच्या राजकरणापोटी राज्याचे वातावरण बिघडवायचे आहे, असा आरोप देखील यशोमती ठाकूर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!