पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर सध्या अनेक नेते त्याच सोबत इतरही काही मोठे मंडळी असल्याचे दिसत आहे. महावीकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या या आरोपांमुळे अनेकांवर सध्या कारवाई देखील सुरू आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. यावेळी देखील त्यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप केले आहेत.
जालना सहकारी साखर कारखाना विकत घेण्यासाठी अर्जुन शुगर इंडसस्ट्रीकडूनच खोतकर यांनीच तापडिया ग्रुपला ३१ कोटींचा धनादेश दिला आणि पुन्हा तापडिया ग्रुपने (Tapdiya Group) तो ४२ कोटींना विकत घेतला. त्याच सोबत आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता मुंबईचे जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre-Patil) यांच्या पत्नीवर देखील आरोप केले आहेत.
जालना साखर कारखान्याच्या शेअर होल्डरमध्ये मुंबईचे जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी रुपाली विश्वास नांगरे पाटील यांचे नाव असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबईचे जॉईंट कमिशनर असलेल्या विश्वास नांगरे पाटील यांनी हा बेनामी कारखाना विकत घेतला, असा दावा देखील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी आणि तोपर्यंत विश्वास नांगरे पाटील यांना पोलिस दलातून मुक्त करा, अशी मागणी देखील सोमय्या यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘दारूच्या दुकानांबाहेर ना गरिबी दिसते, ना तिथे कुणी अनुदान वा आरक्षण मागते’
- शरद पवारांनंतर आता चंद्रकांत पाटलांचे पावसात भाषण
- ‘मविआ एसटी कर्मचाऱ्यांविरोधात दंड थोपटतंय हा पुरुषार्थ नाही’
- खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक अधिकारी गजाआड व्हायलाच हवा- संजय राऊत
- मराठी साहित्याशी संबंध नसलेल्या जावेद अख्तरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याचे औचित्य काय? भाजपचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

