मुंबई: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. यानंतर संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर अनेक टीका टिप्पणी करत असताना पाहायला मिळाल्या. तसेच शिवसेना उमेदवाराच्या पराभवासाठी जबाबदार असलेल्या अपक्ष आमदारांची नावंही संजय राऊत यांनी जाहीर केली होती. यामध्ये मविआ समर्थक मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांचे नाव होते. या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र भुयार यांनी एक अजब प्रस्ताव मांडला आहे.
देवेंद्र भुयार मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “विधानपरिषद निवडणुकीत मविआचा उमेदवार पराभूत झाला तर तो अपक्षांनीच पाडला, असे संजय राऊत त्यादिवशी १०० टक्के बोलतील. या गोष्टीची जाणीव मला आहे. त्यामुळे मी एकचं ठरवलंय की, मी परवाच्या बैठकीत महाविकास आघाडीसमोर एक प्रस्ताव मांडणार आहे. त्यानुसार विधानपरिषद निवडणुकीसाठी मी मतदान करायला जाईन तेव्हा संजय राऊत यांना माझ्यासोबत पाठवावे. मी मतदान करताना संजय राऊत माझ्या टेबलाच्या समोर उभे राहतील. मी त्यांना मत दाखवून मतपेटीत टाकेन”.
तसेच पुढे बोलताना देवेंद्र भुयार म्हणाले, “हे शक्य नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे विधानपरिषदेत मतदाना करण्याचा माझा अधिकार संजय राऊत यांनाच देऊन टाकावा. ते त्यांच्याच हाताने मतपेटीत मत टाकतील”.
महत्वाच्या बातम्या –


