Share

‘यश देशमुख अमर रहे’ ; शोकपूर्ण वातावरणात आणखी एक वीरपुत्र अनंतात विलीन

Published On: 

जळगाव : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिंगबर देशमुख हे शहीद झाले. जळगावमधल्या चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथे त्यांचे पार्थिव आज आणण्यात आले.

यानंतर, आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थ या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी एकवटत होते. काही वेळापूर्वीच शहीद यश देशमुख यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव गावात दाखल झाल्यानंतर गावकऱ्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत तिरंगा रॅली देखील काढली होती.

या वीरपुत्रामागे आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. ते जून २०१९ मध्ये सैन्य दलात रुजू झाले होते. प्रशिक्षणानंतर त्यांची पहिलीच पोस्टिंग श्रीनगरमध्ये झाली होती. पिंपळगाव गावाजवळ असलेल्या मोकळ्या माळरानावर हा अंत्यविधी करण्यात आलेत. आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास अखेरचा निरोप देण्यात आला आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ‘यश देशमुख अमर रहे,’ अशा घोषणा दिल्या. तर अनेकांचे डोळे पाणावले होते. जड अंत:करणाने यश देशमुख यांना मुखाग्नी देण्यात आला.

‘मागून हल्ला केला, पुढून आले असते तर माझ्या यशने ३ जण तरी मारले असते’

भारतमातेच्या रक्षणासाठी सेवा करताना दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात त्यांना हौतात्म्य आलं. ‘त्यांनी मागून हल्ला केला, पुढून केला असता तर माझ्या यशने 3 जण तरी मारले असते’, असा विश्वास पुत्राच्या शहीदीनंतर वडिल दिगंबर देशमुख यांनीं व्यक्त केल्यानंतर सर्वांचाच उर भरून आला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!