Share

माझ्या मध्ये असं काय आहे कि लोक मला एवढा त्रास देतात : कंगना रानौत

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतचे मागील काही दिवसांपूसन राजकीय वाद चालू आहेत. या वादादरम्यान कंगणाच्या कार्यालयावर बीएमसीने कारवाई केली होती कंगनाचे कार्यालय तोडण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि कंगनाचे महाराष्ट्र सरकारवर टीका यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले होते. या रागातूनच ही कारवाई केल्याचा आरोप कंगनाने केला होता.

या कारवाईविरोधात कंगनाने मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. उच्च न्यायालयाने याप्रकरणी बीएमसीची ही कारवाई अवैध ठरवली आहे. ‘महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही रद्दबातल करतानाच, ते कार्यालय महापालिकेला पूर्ववत करून द्यावे लागेल,’ असंही न्यायालयानं फटकारलं आहे.

यावरच  मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, कंगणावर जोरदार टीका केली होती. कंगणाच्या ऑफिसवर झालेली कारवाई हि कायद्याने झाली आहे त्या मध्ये कोणताही राजकीय कट नाही असंही त्या म्हणाल्या होत्या.

त्यांच्या या मुलाखतीला रिट्विट करत कंगणाने सडेतोड उत्तर दिले आहे.  प्रतिउत्तर देताना लिहिले कि, या काही महिन्यांत महाराष्ट्र सरकारकडून मला कायदेशीर खटले, अपमान, अपमान, नेम कॉल करणे बॉलिवूड माफिया बनवते, आणि आदित्य पंचोली आणि हृतिक रोशनसारखे लोक दयाळू लोकांसारखे दिसत आहेत ….मी आश्चर्यचकित करते की माझ्यामध्ये असे काय आहे जे लोक खूप त्रास देतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!