Share

‘मनात केवळ सूडबुद्धी भरलेल्या व्यक्तीकडून चांगुलपणाची अपेक्षा कोण करेल’

Published On: 

पुणे : गेले आठ महिने देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोट्यवधी लोकांना या रोगाचीलागण झाली तर लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या रोगावर ठोस औषध नसल्याने करण्यात आलेल्या ताळेबंदीमधून सावरत असतानाच दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे पुन्हा उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

अशातच एक सकारात्मक वृत्त समोर येत आहे. पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून (SII) विकसित करण्यात येत असलेली ‘कोव्हिशिल्ड’ ही लस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 90 टक्के प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. ही माहिती खुद्द सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी करोना लसीच्या प्रगतीसंबंधी माहिती घेण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटला आज भेट देणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी हे शनिवारी दुपारी एक ते दोन या कालावधीत ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला भेट देऊन हैदराबादला जाणार होते. मात्र, त्याऐवजी ते हैदराबादहून पुण्यात येणार असल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे भेटीच्या वेळेत थोडा बदल होणार आहे.’

दरम्यान, राजशिष्टाचारानुसार पंतप्रधान एखाद्या राज्यात गेल्यास तेथील मुख्यमंत्री त्यांच्या स्वागतासाठी येतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला स्वागत समारंभ आणि भेटीगाठी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुण्यात पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार नाहीत, अशी माहिती राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजशिष्टाचाराचे पालन करत असताना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून टीका केली आहे. ‘मनात केवळ सूडबुद्धी भरलेल्या व्यक्तीकडून चांगुलपणाची अपेक्षा कोण करेल’? असा टोला भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!