Share

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी औरंगाबादेत विभागीय आयुक्तालयासमोर चक्क अवतरले ‘यमराज’!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्यातील विविध इंग्रजी शाळा संघटनांनी मोर्चे आंदोलने करूनही शासनाकडे इंग्रजी शाळांचा मागण्या प्रलंबितच आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.२७) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ‘यमराजा’ची वेशभूषा साकारून मेसा इंग्रजी संघटनेच्या वतीने आंदोलन करत सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी यमराजाची वेशभूषा साकारून मेसा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आरटीई  प्रतिपूर्तीची थकित रक्कम मिळावी, तसेच सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे पालकांनी शाळेची फीस भरणा करण्याबाबत  शासनाने तातडीने परिपत्रक निर्गमित करावे, विना टीसी प्रवेश परिपत्रक रद्द करा, शाळा इमारतीस लाईट बिल व मालमत्ता करात ५०% सवलत देऊन कोरोना काळातील शंभर टक्के रक्कम माफ करावी. आदी मागण्या करण्यात आल्या.

तसेच स्कूल बस टॅक्स रद्द करावा, तसेच सवलत देऊनही वर्षभर फीस न भरणाऱ्या पालकांच्या पाल्याचा प्रवेश रद्द करून शाळांना कायदेशीर कारवाई  करण्याबाबत शासन अध्यादेश काढावा. शाळेशी संबध नसलेल्या व्यक्तिंना शाळा प्रवेशबंदी करुन संरक्षण कायदा करावा आदी मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यांसाठी  आज ‘म्हसनात नेऊ नका’ या नाटकातील ‘यमदुत’ व इतर पात्राची रंग व वेशभुषा करून विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना मेसा इंग्रजी शाळा संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रल्हाद शिंदे – हस्तेकर  , सरचिटणीस प्रविण आव्हाळे, उपाध्यक्ष नागेश जोशी,  आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!