Share

यामी गौतमचा नवा सिनेमा ‘लॉस्ट’, लग्नानंतर पहिलाच चित्रपट

Published On: 

मुंबई : काही दिवसापुर्वीच यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर यांनी लग्न केले. लग्नानंतर काही दिवस होताच यामीने मंगळवारी १३ जुलै रोजी नव्या चित्रपटाची घोषणा केली. लॉस्ट या चित्रपटाद्वारे यामी चित्रपटात परत येत आहे.

‘लॉस्ट’ हा चित्रपट एक थरारक शोधकथा आहे. या चित्रपटात यामी गौतम व्यतिरिक्त पंकज कपुर, राहुल खन्ना, पीया वाजपेयी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन बंगाली दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी हे करणार आहे. त्यांनी यापुर्वी अमिताभ बच्चन यांचा अभिनय असलेल्या पींक या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

या चित्रपटाची कथा ही कोलकाता शहराशी संबधीत आहे. यामी यात क्राईम रिपोर्टरची भूमिका करणार आहे. यापुर्वी यामीचा ‘भुत पोलीस’ हा चित्रपट प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात यामी सोबत सैफअली खान, जॅकलीन फर्नांडीस, अर्जुन कपुर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहे. येत्या १६ संप्टेंबर रोजी हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!