मुंबई – मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा मंत्रीमंडळ विस्तार नुकताच पार पडला. यात महाराष्ट्रातील ४ नेत्यांना स्थान मिळालं. यात खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती मात्र त्यांच्या जागी डॉ भागवत कराड यांना स्थान मिळालं. यानंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली. यानंतर बीड, नगरमध्ये पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली.
अशात, पंकजा मुंडे रविवारी दिल्लीत गेल्या. तिथे त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची आणि नंतर मोदींची भेट घेतली. एकीकडे दिल्लीत भेटीचं सत्र सुरु असताना महाराष्ट्रात राजीनाम्याचे सत्र सुरुच होते. यामुळे, पंकजा मुंडे यांनी आज (१३ जुलै) मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली आहे.
प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं समर्थक आक्रमक झालेत मुंडे भगिनींना भेटण्यासाठी ते परळीहून मुंबईत दाखल झालेत. मुंडे भगिनींना सातत्याने डावलण्यात येत असून त्याचा निषेध म्हणून आम्ही राजीनामे दिले आहेत, असं या समर्थकांनी सांगितलं.
दरम्यान, पंकजा मुंडे या समर्थकांची नाराजी दूर करून त्यांना राजीनामा मागे घेण्यास सांगणार असल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा यांच्याकडून समर्थकांना सबुरीने घेण्याचा सल्लाही दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, आज या बैठकीत काय होणार? पंकजा मुंडे समर्थकांना काय सांगणार? त्यानंतर राजीनामा सत्र बंद होणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. मुंबईत वरळीमध्ये ही बैठक होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ, ईडीकडून चौकशी सत्र सुरूच
- ‘योगींनी दोन मुलांऐवजी जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणले पाहिजे’
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेचे पटोलेंना प्रत्युत्तर


