Share

 इंधन दरवाढी विरोधात युवक कॉंग्रेसचे स्वाक्षरी अभियान; राष्ट्रपतींना देणार १ कोटी नागरिकांच्या सह्यांचे निवेदन 

Published On: 

अकोला – भारतीय जनता पक्षाचे दोन कोटी नोकऱ्या, १५ लाख रु, अशी अनेक आश्वासने हवेतंच विरली आहेत. मोदी सरकारच्या काळात इंधन दरवाढीने उच्चांक गाठलेला आहे. देशातील व राज्यातील युवकांमधे मोदी सरकार विरुद्ध प्रचंड असंतोष आहे. या विरुद्ध महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेससुद्धा प्रचंड आक्रमक पणे आंदोलन  करत आहे.

दरम्यान,  महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे ह्यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम राज्यभरात दि.११-१५ एप्रिल दरम्यान सुरु आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या व विधानसभा मतदार संघाच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे. युवक कॅांग्रेस चे राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी इंधन दरवाढी विरोधात, पेट्रोल पंप , बाजार पेठ, गर्दिचे ठिकाण , इ. ठिकाणावरुन नागरिकांच्या स्वाक्षऱ्या गोळा करणार आहेत. आणी १ कोटी नागरीकांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांना सोपविण्यात येणार आहे.  अशी माहीती प्रदेश युवक कॅांग्रेस चे प्रवक्ते कपिल ढोके ह्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सद्यस्थितीत, पेट्रोल १०७ रु, डिझल ९७ रु, गॅस ९०० रु, खाद्यतेल १६० रु पर्यंत जाऊन पोहचले आहे. हि दरवाढ सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. या विरोधात राज्यातील नागरिकांनी युवक कॅांग्रेसच्या या राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीमेत सहभागी व्हावे असे आवाहन प्रवक्ते कपिल ढोके ह्यांनी केले आहे.

अकोल्यातुन सुद्धा ३ लाख स्वाक्षऱ्या पाठवणार 

युवककॉंग्रेसची इंधन दरवाढी विरोधातील राजव्यापी स्वाक्षरी मोहीम ही सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे. ह्या राज्यव्यापी मोहीमेत अकोला जिल्ह्यातुन सुद्धा ३ लाख स्वाक्षऱ्या पाठवण्यात येणार आहेत. अकोट-मुर्तिजापुर, बाळापुर, अकोला पुर्व व पश्चिम ह्या ५ ही विधानसभा मतदार संघात युवक कॅांग्रेस कार्यकर्ते स्वाक्षऱ्या गोळा करत आहेत. त्यासाठी युवक कॉंग्रेसचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष महेश गणगणे, शहर अध्यक्ष अंशुमन देशमुख,प्रदेश महासचिव सागर कावरे, प्रवक्ते कपिल ढोके, सचिव विवेक गावंडे, निनाद मानकर ह्यांच्यासह विधानसभा व जिल्हास्तरावरील कार्यकर्ते काम करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!