Share

पृथ्वी शॉला डावलून ‘या’ शिलेदाराला मिळाली इंग्लंड दौऱ्यासाठी संधी

Published On: 

मुंबई : आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयने तातडीने आयपीएल स्पर्धा स्थगित केली. स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडूंनी चमक दाखवली. मात्र नुकत्याच इंग्लंड दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या कसोटी संघात एका नविन खेळाडुची निवड झाली. महत्वाची बाब म्हणजे पृथ्वी शॉला डावलून या खेळाडूला निवड समीतीने संघात स्थान दिले.

हा खेळाडू आहे पश्चिम बंगालचा सलामीवीर अभिमन्यु ईश्वरन. २५ वर्षिय अभिमन्युने २०२८-१९ रणजी करंडक स्पर्धेत ६ सामन्यात ८६१ धावा चोपल्या होत्या. यानंतर तो प्रकाशझोतात आला.यानंतर २०१९ दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने १५३ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अभिमन्युने ६४ प्रथम श्रेणी सामन्यात १३ शतकांच्या मदतीने ४४०१ धावा केल्या आहेत. तर टी-२० सामन्यात ४१७ धावां केल्या आहेत.

महत्वाची बाब म्हणजे खराब कामगीरीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातुन संघाबाहेर झालेल्या पृथ्वी शॉकडे निवड समितीने पुन्हा दुर्लक्ष केले आहे. तसेच ऑस्ट्रेलीया दौऱ्यात खेळाडूच्या जखमी झाल्यामुळे जी परिस्थीती ओढावली होती. ती परिस्थीती इंग्लंडमध्ये ओढावू नये यासाठी निवड समितीने काळजी घेतली आहे.

भारतीय संघ
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल (फिटनेसवर अवलंबून), वृद्धिमान साहा (फिटनेसवर अवलंबून).

राखीव खेळाडू – अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नाग्वास्वाल्ला

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!