मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपतूच्या आत्महत्या नंतर त्याची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती वर संशय घेण्यात आला होता. त्यानंतर ती वादाच्या रिया भोवऱ्यात सापडली. या घटनेने संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती.या प्रकरणी रियावर सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर सुशांतच्या आत्महत्याची चौकशी करत असताना ड्रग्स प्रकरणात रियाला एनसीबीने ताब्यात घेतलं. त्यानंतर जामिनावर रिया घरी परतली. मात्र सुशांतच्या आत्महत्येला लवकरच एक वर्ष पूर्ण होतं असून, याबाबत अजूनही काय ठोस पुरावे समोर आले नाही. १४ जूनला सुशांत सिह राजपूतने वांद्रे इथल्या त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती.
या सर्व प्रकरणानंतर रियाने सोशल मीडियाकडे पाठ वळवली होती. मात्र गेल्या काही महिन्य़ांपासून रिया पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचं दिसतं आहे. नुकतेच तिने एक पोस्ट शेअर केली असून यात ती म्हणाली की, ‘मोठ्या दु:खातून मोठं बळ मिळतं. तुम्हाला यावर फक्त माझा विश्वास ठेवावा लागेल. तिथेच थांबावं लागेल, लव्ह रिया’. रियाच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही सेलिब्रिटींनी देखील यावर कमेंट केली आहे.
https://www.instagram.com/p/CPYYxumHXLW/?utm_source=ig_embed&ig_rid=1695e7e7-d256-4520-b1ba-5de06e160faf
काही दिवसंपूर्वीच अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ‘रियल लाईफ हिरो’ असणाऱ्या आपल्या काकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे गमावल आहे. याबाबत रियाने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली होती. अभिनेता सुशांत सिंग मृत्यूच्या प्रकरणामुळे ती चांगलीच चर्चेत राहिली.
महत्वाच्या बातम्या
- दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, ‘असा’ लागणार दहावीचा निकाल
- अश्विनने आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर केला खुलासा ; झोपेशिवाय 8-9 दिवस खेळला सामने
- बीडमध्ये कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ!
- अकरावीचे प्रवेश कसे होणार ? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती
- “काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ जास्त”


