Share

‘या’ भाजप आमदाराने ५०० कोटींचा घोटाळा केला; ईडीच्या कारवाईनंतर खा.भावना गवळींचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

यवतमाळ : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी अडचणीत सापडल्या आहेत. यवतमाळ-वाशिमच्या खासदार असलेल्या भावना गवळींच्या ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने धाड टाकली आहे. मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळी यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. त्याच अनुषंगाने ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या.

यावर बोलताना भावना गवळी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, ‘मला ईडीची कसलीटी नोटिस आलेली नाही. माझ्या संस्थेवरती जे अधिकारी आले आहेत ते चौकशी करत आहेत. सर्वप्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. पण, भाजप नेत्यांच्या मागेही ईडीची नोटिस लावा.’

‘आम्ही जनतेच्या हिताचं काम करत आहोत. गेल्या दहा दिवसांपूर्वी मी मागणी केली होती की भाजप नेत्यांची चौकशी व्हावी. याठिकाणचे जे भाजप आमदार आहेत ते भूमाफिया आहेत. त्यांनी पाचशे कोटींचा घोटाळा केला आहे. केंद्र सरकार त्यांच्यामागे ईडी लावणार का? माझ्या मागे जशी ईडी लावलीये. तशी त्यांच्या मागेही इडी लावा, अशी माझी विनंती आहे. केवळ शिवसेनाला टार्गेट करुन असं केलं जात आहे. राजकारणाची पातळी घसरत आहे. आतापर्यंत अशाप्रकारची गोष्ट कधी पाहिली नाही, ती आता पाहायला मिळत आहे. माझी आणि संस्थेची कसलीही चौकशी करा. आम्ही आणि शिवसेना पक्षप्रमुख शांत आहोत, पण आम्ही लढणार आहोत’ असं खासदार गवळी म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!