मुंबई : मराठी सिनेसृष्टीत बोल्ड अॅण्ड ब्युटी अशा गुणांची खाण असलेल्या अनेक अभिनेत्री आहेत. त्यापैकीच एक असलेली अभिनेत्री नेहा महाजन. तिने अभिनयाच्या क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. नुकत्याच एका चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी तिचं नाव समोर आल्याने चाहते मात्र खुश झाले आहे.
काही दिवसांपूर्वी ‘बाबू’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. या चित्रपटातील एक ॲक्शन सीन चर्चेत होता. या सीनमध्ये अभिनेता अंकित मोहनची जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळाली. त्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता या चित्रपटात मूख्य भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे.
https://www.instagram.com/p/CVcXKjYKtQI/?utm_source=ig_web_copy_link
ॲक्शनचा धमाका असणाऱ्या ‘बाबू’ या चित्रपटात आता नेहा महाजनची एण्ट्री झाली आहे. मराठी, हिंदी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली नेहा महाजन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या तिचा या चित्रपटातील लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात तिने लाल रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. त्यामुळे नेहाचा हा एकंदर पेहराव बघून या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांमधील उत्सुकता आता अधिकच वाढली आहे.आता चित्रपटात नेहाची भूमिका काय आहे? असा प्रश्न पडला आहे. प्रेक्षकांमा त्यांच्या या प्रश्नाचे लवकरच उत्तर मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे हे आहेत. या चित्रपटात अंकित मोहन, नेहा महाजनसोबत रुचिरा जाधवही दिसणार असून हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इंडस्ट्रीमधील सगळ्यांची मुले एकदा तरी तुरुंगात जातील’; मिका सिंगने व्यक्त केला संताप
- तेजस्विनीच्या बोल्ड फोटोवर ‘खल्लास…’म्हणत चाहत्यांनी दिली पसंती
- मौलाना अहमद यांनी आधी माहिती घ्यायला हवी होती; क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले
- राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने मानहानीचा गुन्हा दाखल केल्यानंतर शर्लिनने दिले प्रत्युत्तर
- संभाजी राजेंच्या मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्याचे सोलापूरात उत्साहात स्वागत


