मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड,ब्युटीफुल तेजस्विनी पंडित. ती अभिनयासह सोशल मीडियावर ही चांगलीच लोकप्रिय आहे. तसेच चाहत्यांसाठी फोटो, व्हिडिओ शेअर करत असून तिचे नुकतेच फोटोशूट पाहून चाहत्यांनी भरपूर कमेंट केले आहेत.
बऱ्याच दिवसानंतर तेजस्विनीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात अभिनेत्री एकदम बोल्ड दिसत आहे. तेजस्विनीला अशा लूकमध्ये पाहून, चाहते मात्र खुश झाले आहेत. या फोटोमध्ये तिने बॉटल ग्रीन रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. अभिनेत्रीच्या आजूबाजूला हिरवळ दिसत आहे. यात तेजस्विनी ज्याप्रकारे फोटोसाठी पोझ देतेय, चाहते मात्र फिदा झाले. अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अदांमुळे हा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवर खूप सुंदर, व्हेरी नाईस, ‘खल्लास..’ यासह अनेक कमेंट येत असून चाहत्यांसोबतच कलाकार मंडळी सिद्धार्थ जाधव, सुखदा खांडकेकर, शाल्व किंजवडेकर, ऋतुजा बागवे यासारख्या कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CVhAN7dop0e/?utm_medium=copy_link
तेजस्विनीने केदार शिंदे दिग्दर्शित’अग्गं बाई अरेच्चा’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तर तेजस्विनी अखेर ‘समांतर’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती चित्रपटांव्यतिरिक्त तेजस्विनी सोशल मीडियावरही सक्रिय असून चाहत्यांशी संपर्कात राहते.
महत्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- भाजप सरकारच्या काळात गोव्याची अवस्था केविलवाणी झालीये; शिवसेनेचा टोला
- भाजपच्या कार्यक्रमात गुंडांच्या सौभाग्यवतींची हजेरी; गदारोळ होताच चंद्रकांत पाटील म्हणाले, पास नव्हते!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

