🕒 1 min read
सोलापूर : मराठा आरक्षणप्रकरणी खासदार संभाजीराजे पुन्हा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने दिलेलं आश्वासन न पाळल्याने संभाजीराजे पुन्हा राज्यभर दौरा करणार आहेत. रायगडपासून २५ ऑक्टोबरला दौऱ्याची सुरूवात करण्यात आली. आज त्यांचा हा संवाद दौरा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात दाखल झाला, यावेळी मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणासाठी रायगड ते मुंबई लाँग मार्च काढला आहे. रायगडमधून या जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. मराठा समाजाने लाँगमार्चच्या तयारीला लागावे, असे आवाहन संभाजी राजे यांनी केले. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांवर सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. या सरकारला जागे करण्यासाठी आता मराठा समाजाने पुणे ते मुंबई लाँगमार्च काढण्याची तयारी करावी, असे संभाजीराजे यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षण जनसंवाद दौरा, सोलापूर जिल्हा
मोहोळ तालुक्यात उत्साहात स्वागत…. pic.twitter.com/Lc7sqcJBVd
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 27, 2021
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. सारथी सोडता इतर मुद्द्यावर दिलेले आश्वासन राज्य सरकारने पाळलेले नाही. त्यामुळे हा दौरा काढण्यात आला आहे. असे संभाजी राजे म्हणाले. राज्य सरकार आपली जबाबदारी पाळत नाही. सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर त्यांनी आश्वासन पाळले नाहीत, असा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे.
आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही. आता आणखी काय चर्चा करायची आहे. मराठा आरक्षणासाठी जे करता येईल, ते आम्ही करणार आहोत. त्यासाठी कुणी काय टीका करते त्याकडे मी लक्ष देत नाही. टीकाकारांना विनंती आहे त्यांनी आपला वेळ समाजासाठी द्यावा, असे अवाहनही त्यांनी राजकीय नेत्यांना केले.
महत्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- भाजप सरकारच्या काळात गोव्याची अवस्था केविलवाणी झालीये; शिवसेनेचा टोला
- भाजपच्या कार्यक्रमात गुंडांच्या सौभाग्यवतींची हजेरी; गदारोळ होताच चंद्रकांत पाटील म्हणाले, पास नव्हते!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
