Share

‘इंडस्ट्रीतील सगळ्यांची मुले एकदा तरी तुरुंगात जातील’; मिका सिंगने व्यक्त केला संताप

Published On: 

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एसीबीने केलेल्या कारवाईमुळे अटकेत आहे. त्याच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरणात अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु आहे. याप्रकरणी अनेक बॉलीवूड कलाकारांनी आर्यनला पाठिंबा दिला आहे. यातच आता गायक मिका सिंगने याबाबत संताप व्यक्त केला आहे.

मिकाने संजय गुप्ता यांचे ट्वीट रिट्वीट केले आहे. ‘तुमचे अगदी बरोबर आहे. सर्वजण काय सुरु आहे हे फक्त पाहात आहेत, पण एकही शब्द बोलत नाहीत. माझा शाहरुख खानला पाठिंबा आहे. आर्यन खानला जामीन मिळायला हवा. मला असे वाटते इंडस्ट्रीमधील प्रत्येकाची मुले एकदा तरी तुरुंगात जातील, तेव्हाच सर्वजण एकत्र येतील’ या आशयाचे ट्वीट मिका सिंगने केले आहे.

संजय गुप्ता म्हणाले होते की, शाहरुख खानने चित्रपटसृष्टीत हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. चित्रपटसृष्टीच्या प्रत्येक कार्यासाठी तो नेहमीच मदत करत असतो. आणि आज त्याच इंडस्ट्रीमधील लोक त्याच्या कठीण काळात मौन बाळगून आहेत. हे किती लज्जास्पद असल्याचे गुप्ता म्हणाले होते.

दरम्यान,आर्यनकडे कुठल्याही प्रकारचं ड्रग्स मिळालं नाही. त्यांच्याविरोधात आरोप हा आहे की, आरोपी अरबाज मर्चंट सोबत क्रुझवर आला होता आणि त्याच्यावर ड्रग्स ठेवल्याचा आरोप आहे. आर्यन विरोधात कट रचला जातोय. आर्यन अरबाजसोबत आला. आर्यनला अरबाजकडे असलेल्या गोष्टींची माहिती असल्याचा दावा केला जातोय. कुणाच्यातरी बुटामध्ये काय आहे, त्याच्याशी आर्यनचा काही संबंध नाही, असा दावा रोहतगी यांनी केला आहे. आजच्या सुनावणी दरम्यान आर्यनच्या सुटकेत वाढ होणार की सुटका होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!