मुंबई : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले. ७ गडी बाद करणाऱ्या न्युझीलंडचा गोलंदाज कायली जेमीसनला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्युझीलंडकडून ८ गडी राखुन पराभव स्विकारावा लागला. सामन्यानंतर बोलताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला प्रश्न विचारण्यात आला की, संघनिवड करण्यात चुक झाली होती का असा प्रश्न विचारण्यात आला तर, यावर विराट कोहलीने संघनिवड अगदी बरोबर होती असे म्हणले आहे. इतर चुका त्याने मान्य केल्या मात्र संघनिवड करताना त्याने चुक केली हे तो मान्य करायला तयार नव्हता. याबद्दल मला कोणताही पश्चात्ताप नाही. आम्ही आमचा सर्वोत्तम संघ मैदानात उतरवला होता असे कोहली यावेळी म्हणाला.
मात्र भारतीय फलंदाज ३०-४० धावा कमी केल्या असे विराट म्हणाला. तसेच प्रतिस्पर्धी संघाने गोलंदाजी अत्यंत योजनाबद्ध केली असे विराट यावेळी म्हणाला. यावेळी त्याने सामनावीर कायली जेमीसन बद्दल कौतुक करताना विराट म्हणाला की, ‘जेमीसनने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत संघासाठी योगदान दिले. त्यामुळे तो सामनावीराचा मानकरी ठरला.’ कायली जेमीसनने या सामन्यात दोन्ही डावात कोहलीला बाद केले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘आप से बेहतर उम्मीद किये थे हम’, मिम्स शेअर करत सेहवागने व्यक्त केली नाराजी
- कर्णधार कोहलीने सांगितले पराभवाचे कारण, म्हणाला…
- ‘या’ कारणांमुळे झाला टीम इंडियाचा पराभव
- स्वप्न भंगले! भारताला नमवत न्युझीलंड बनला ‘विश्व चॅम्पियन’
- मराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी फडणवीस सरकारच्या प्रकल्पाबाबत मोठा निर्णय !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

