इंग्लंड : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) विजेतेपद मिळवण्याचे विराट ब्रिगेडचे स्वप्न भंगले आहे. न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला. यासह न्यूझीलंडच्या संघाने विजेतेपद मिळविले आणि विराट ब्रिगेड आयसीसी करंडक जिंकण्यात चुकला. पराभवानंतर कोहलीने याचे कारण सांगितले आहे.
सामन्यानंतर कोहली म्हणाला, पावसाच्या व्यत्ययामुळे भारतीय संघाची लय बिघडली होती. ‘पहिला दिवस पावसाने वाहून गेला आणि जेव्हा खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा लय शोधणे कठीण होते. आम्ही फक्त तीन विकेट गमावल्या, जर पाऊसाचा खेळात व्यत्यय नसता तर आम्ही आणखी धावा करू शकलो असतो.
यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनने कोहली आणि भारतीय संघाचे कौतुक केले आहे. विल्यमसन म्हणाला, ‘मी विराट आणि भारतीय संघाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तो एक अविश्वसनीय संघ आहे, आम्हाला माहित होतं त्यांच्या सोबतचा सामना आव्हानात्मक असेल. आमचा संघ विजय नोंदविण्यात यशस्वी झाला याचा मला आनंद आहे.
The @BLACKCAPS dressing room the moment Ross Taylor hit the winning runs in the #WTC21 Final ???? pic.twitter.com/FAO5vuYGd8
— ICC (@ICC) June 23, 2021
पुढे विल्यमसन म्हणाला, ‘ही खूप खास भावना आहे. आमच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच आपण विश्वविजेतेपद जिंकले आहे. गेल्या दोन वर्षात आमच्या संघाशी संबंधित प्रत्येक खेळाडूने यात एक भूमिका बजावली आहे. ही एक विशेष कामगिरी आहे.’
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ कारणांमुळे झाला टीम इंडियाचा पराभव
- स्वप्न भंगले! भारताला नमवत न्युझीलंड बनला ‘विश्व चॅम्पियन’
- मराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी फडणवीस सरकारच्या प्रकल्पाबाबत मोठा निर्णय !
- इंडिगोची औरंगाबाद ते दिल्ली, हैदराबाद विमान सेवा ५ जुलैपासून
- राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.९३ टक्के ! जाणून घ्या आजची रुग्णसंख्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

