मुंबई : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्युझीलंडने भारतीय संघाला पहिल्या डावात २१७ धावांवर रोखले. न्युझीलंडने त्याच्या पहिल्या डावात चांगली सुरुवात केली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर न्युझीलंडची स्थिती १०१ वर २ बाद अशी होती.
यादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पुन्हा एकदा जुन्या ट्विटमुळे चर्चेत आला आहे. सहा वर्षापुर्वी २०१५ मध्ये आर्चरने ‘संपुर्ण दिवस पाउस’ असे ट्विट केले होते. आता डब्ल्युटीसी अंतिम सामन्यात पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे हे ट्विट पुन्हा व्हायरल होता आहे. यापुर्वी ही अनेक वेळा जोफ्रा आर्चरचे जुने ट्विट व्हायरल झालेले बघायला मिळाले आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान ही त्याने केलेल्या जुन्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली होती.
Rain all day
— Jofra Archer (@JofraArcher) March 18, 2015
डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वात जास्त खेळ कुणी केला असेल तर पावसाने. सामन्याचा पुर्ण दिवस पाऊस असल्याने संपुर्ण दिवसाचा खेळ वाया गेला. यानंतर दुसऱ्या दिवशी खेळ सुरु झाला तर अपुऱ्या प्रकाशामुळे पुन्हा खेळ थांबवण्यात आला. तर तिसऱ्या दिवशी पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे एक वेळेस सामना थांबवण्यात आला. आज चौथ्या दिवशीही पावसामुळे सामना अद्यापही सुरु होऊ शकला नाही.
महत्वाच्या बातम्या
- धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या तहसीलदारांवर कारवाईसाठी खंडपीठात याचिका
- शरद पवारांची प्रशांत किशोर यांच्यासोबत दिल्लीत खलबतं; मलिकांनी केला भेटीच्या हेतूचा खुलासा
- राजकीय भूकंपाची नांदी ? दिल्लीत शरद पवारांचे प्रशांत किशोरांसोबत खलबतं
- थकबाकीबाबत स्पष्टीकरण नसल्याने ठेवीदार हायकोर्टात जाण्याच्या तयारीत
- ‘आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा?’; काँग्रेसचा शिवसेनेवर पलटवार


