🕒 1 min read
मुंबई : शस्त्रक्रियेनंतर सक्रिय झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली आहे. यानंतर आता उद्या शरद पवारांच्या निवासस्थानीच विरोधी पक्षातील १५ ते २० बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
शरद पवार यांनी कालच अचानक दिल्ली गाठली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लगावले जात आहेत. पवार-किशोर यांची ही दुसरी भेट असून या दोघांमध्ये नेमकं कोणत्या विषयावर खलबतं झाली याबाबत राजकीय वारुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या भेटीबाबत भाष्य केलं आहे. ‘सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा अजेंडा पवारांनी ठरवाला आहे. सुरुवातीला मोजक्या पक्षांसोबत पवारांची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर सर्वांना एकत्र कसं आणलं जाईल त्याबाबत सर्व नेते ठरवतील,’ अशी माहिती मलिकांनी दिली आहे.
राष्ट्रमंचच्या छताखाली भाजपला सक्षम पर्याय देण्यासाठी पवार सक्रिय ?
2018 मध्ये यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंच स्थापन केला होता. आता याच राष्ट्रमंचच्या बॅनरखाली एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रीय जनता दल,तृणमूल, आम आदमी पक्षासह इतर पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
भाजपला केंद्रीय सत्तेपासून रोखण्यासाठी नेमकं काय करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय युपीए अध्यक्षपद शरद पवारांना देण्याबाबत तसेच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधून पवारांचा चेहरा पुढे करण्यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते अशी शक्यता आहे.
दरम्यान, उद्याच्या बैठकीला काँग्रेसला आमंत्रित करण्यात आलं की नाही याबाबतची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे उद्याच्या बैठकीला काँग्रेस उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर या पक्षांनी कॉंग्रेस शिवाय एकत्र येवून निवडणूक लढण्याची तयारी केली तर कॉंग्रेस नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांचा हा काही पहिला प्रयत्न नाही, तर…’; पवार-किशोर भेटीवर काँग्रेसची खोचक प्रतिक्रिया
- राजकीय भूकंपाची नांदी ? दिल्लीत शरद पवारांचे प्रशांत किशोरांसोबत खलबतं
- थकबाकीबाबत स्पष्टीकरण नसल्याने ठेवीदार हायकोर्टात जाण्याच्या तयारीत
- ‘आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा?’; काँग्रेसचा शिवसेनेवर पलटवार
- ‘जयंत पाटलांनी शिवसेनेसोबत युती जाहीर करावी’; नाना पटोलेंच खुलं आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
