Share

‘विराटने कर्णधारपदावरून राजीनामा देण्याची चुकीची वेळ’; आयपीएलमधील माजी कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

दुबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आयपीएल 2021 नंतर संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. विराट कोहलीने आरसीबीने जारी केलेल्या व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. फ्रँचायझीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विराट कोहलीचा कर्णधार म्हणून आरसीबीसाठी हा शेवटचा हंगाम असणार आहे. मात्र, कोहलीने घेतलेल्या निर्णयाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह लावले आहेत.

रविवारी रात्री चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील दुसऱ्या लीगच्या पहिल्या सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्स कार्यक्रमादरम्यान गंभीर म्हणाला की, दुसऱ्या लीगच्या सुरूवातीपूर्वी विराटने आरसीबी कर्णधारपद सोडण्याची घोषणा करायला नको होती. त्याने असे केल्याने संघाच्या कामगिरीवर परिणाम होईल.

सध्याच्या मोसमानंतर विराट कर्णधारपद सोडल्याची माहिती मिळाल्यानंतर गंभीरने प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, विराट कोहलीचा हा निर्णय धाडसी आहे. पण स्पर्धा संपल्यानंतरही तो ही घोषणा करू शकला असता. सध्या त्याची टीम सुस्थितीत आहे. पण त्याने कर्णधारपद सोडल्याच्या घोषणेचा मानसिकदृष्ट्या खेळाडूंवरही परिणाम होईल ज्याचा त्यांच्या खेळावर परिणाम होईल.

गंभीर पुढे म्हणाला, विराटच्या या निर्णयामुळे संघ अस्वस्थ होईल. आता खेळाडूंच्या मनात येईल की यावेळचे विजेतेपद विराट कोहलीला मिळवायचे आहे. अशा परिस्थितीत, खेळाडू स्वत: ला अधिक धक्का देण्याचा प्रयत्न करतील ज्याचा त्यांच्या खेळावर परिणाम होईल. म्हणूनच विराटने चुकीच्या वेळी ही घोषणा केली असल्याचं गंभीरने म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!