Share

केबीसीमध्ये पुन्हा स्पर्धकाला विचारला चुकीचा प्रश्न?; सोशल मीडियावर होतेय चर्चा

Published On: 

मुंबई :  छोट्या पडद्यावरील बहुचर्चित आणि यशस्वी शो ‘कौन बनेगा करोडपती’ ची नेहमीच चर्चा होता असते. अनेक स्पर्धकाना आपल्या  ज्ञानाच्या जोरावर नशीब बदलून टाकता येते. मात्र नुकत्याच सुरु झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ च्या १३ वे पर्व सध्या जोरदार चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या शोमध्ये स्पर्धकाला विचारण्यात आलेला प्रश्न चुकीचा असल्याचे समोर येत आहे. यामुळे या शोबाबत एकच गोंधळ उडाला आहे. याच कारणामुळे हा शो आता सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

यापूर्वीही एका दर्शकाने केबीसीचे निर्माते सिद्धार्थ बसू यांना चुकीच्या प्रश्नाबाबत ट्विट केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका स्पर्धकाला शोमध्ये चुकीचे प्रश्न विचारल्याचा आरोप करण्यात आला. अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला महाराजा गुलाब सिंह यांच्याबद्दल एक प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नावर दावा केला जात आहे की हा एक चुकीचा प्रश्न आहे. स्पर्धकाला विचारण्यात आले होते – ‘भारतातील कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच 1872 मध्ये महाराजा गुलाब सिंग यांनी सुरू केलेली दरबार व्यवस्था रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?’.

याबाबत अश्विनी शर्मा नावाच्या व्यक्तीने हा प्रश्न चुकीचा असल्याचे ट्विट केले आहे. ट्विटरवर या प्रश्नाचा स्क्रीनशॉट पोस्ट करत अश्विनीने ट्वीट केले आणि लिहिले, ‘केबीसी 13 मधील चुकीचा प्रश्न, दरबार प्रणाली 1872 मध्ये महाराजा रणबीर सिंह यांनी सुरू केली होती. 1857 मध्येच महाराजा गुलाब सिंग यांचे निधन झाले आहे. त्यामुळे विचारण्यात आलेला हा प्रश्न चुकीचा असल्याचे अश्विनी यांनी म्हंटले आहे. परंतु याविषयी शोच्या निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!