Share

सारंगी महाजन राजकारणात येण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ज्येष्ठ भाजप नेते स्व.प्रमोद महाजन यांचे भाऊ आणि स्व.प्रवीण महाजन यांच्या विधवा सारंगी महाजन राजकारणात येण्याची शक्यता आहे. राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या महाजन-मुंडे या मातब्बर घराण्यातील सारंगी महाजन या सध्या आत्मचरित्र लिहीत आहेत. आपल्या आत्मचरित्रावर वेबसिरीज काढली जावी, अशी त्यांची इच्छा आहे. एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत मला राजकारणाची अॅलर्जी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत

जेष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन यांची प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी ठाण्याच्या तुरुंगात शिक्षा भोगताना प्रवीण महाजन यांचा २०१५ साली मृत्यू झाला होता. ‘प्रमोद महाजन यांच्या हत्येची घटना दुर्दैवी होती. दोघा भावांतला तो विषय होता. त्याची माहिती मला अजूनही नाही, असे सारंगी यांनी स्पष्ट केले. मी अन् माझ्या दोन मुलांचा त्यात काय दोष, असे आजपर्यंत एकानेही मला विचारले नाही. तसेच पती प्रवीणच्या वडिलोपार्जित उस्मानाबाद येथील जमीन खटल्यात अजूनही महाजन कुटुंबीयांकडून त्रास दिला जात आहे’, अशी खंत सारंगी यांनी व्यक्त केली.

सारंगी महाजन यांनी सांगितले की, ‘प्रमोद महाजन मला वडिलांसारखे होते. मात्र प्रवीण महाजन यांच्यावर खटला सुरु होता त्यावेळी महाजन कुटुंबीय आणि भाजपचे कार्यकर्ते नाहक त्रास देत असत. मला आणि माझ्या मुलांना त्या काळात काही झाले असते तर महाजन-मुंडे कुटुंबीय जबाबदार ठरले असते असे मी तेंव्हा म्हटले होते.’

ठाणे येथे राहणाऱ्या सारंगी महाजन यांच्या संपर्कात कोणता पक्ष आहे का? त्या आगामी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. दरम्यान, सारंगी यांनी २०१३ मध्ये ‘सारा’ नावाची सामाजिक संघटना चालू केली. विद्यार्थीदशेत त्यांनी ‘अभाविप’मध्ये काम केलेले आहे. सध्या त्या राजकारणात जाण्याच्या तयारीत आहेत. परंतू भाजपमध्ये त्यांच्या विरोधात नकारात्मतेचे वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याशी सारंगी यांची मैत्री आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात पदार्पण करायचे झाल्यास त्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!