Share

‘भाजपचा ईडी, सीबीआयद्वारे कोणावर तरी दबाव आणण्याचा प्रयत्न’, राऊतांचा गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : ‘आम्ही महाराष्ट्रात कोणताही पक्ष फोडला नाही. आज भारतीय जनता पक्ष कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ते कोणावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत’ असा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत आज बुधवारी गोवा दौऱ्यासाठी निघाले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या व मंत्र्यांच्या मागे ईडीची पिडा सुरू झाली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते ईडीच्या रडारवर असताना आता शिवसेना नेत्यांच्या मागेही ईडीचा ससेमिरा सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या १०० कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपांसंदर्भात शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांची मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने जवळपास आठ तास चौकशी केली. देशमुख यांनी खंडणी मागितल्याच्या आरोपांचा ‘ईडी’कडून तपास सुरू आहे. यामधील प्रमुख आरोपी सचिन वाझे याने जानेवारी महिन्यातील एका पत्रात, अनिल परब यांनी मुंबईतील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये खंडणी वसुलीचे लक्ष्य दिले होते, असा आरोप केला आहे.

त्या पार्श्वभूमीवर वाझे याची ‘ईडी’ने दोन वेळा कसून चौकशी केली. तसेच या प्रकरणी अन्य काही आरोपींचीदेखील चौकशी करण्यात आली आहे. या सगळ्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘ईडी’ने शनिवारी परब यांना दुसऱ्यांदा चौकशीचे समन्स बजावले होते. त्यानुसार मंगळवारी परब यांची चौकशी झाली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!