Share

राजकीय नेत्यांच्या फटाके फोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी, म्हणाले..

Published On: 

नवी दिल्ली : दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने राष्ट्रीय राजधानीत १ जानेवारी २०२२ पर्यंत फटाके विक्री आणि फोडण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले. आदेशानुसार, अनेक तज्ज्ञांनी सूचित केले आहे की, लोक मोठ्या संख्येने फटाके फोडून उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतील, ज्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. लोकांच्या एकत्र येण्याने केवळ नियमांचेच उल्लंघन होणार नाही, तर वायू प्रदूषणाच्या उच्च पातळीमुळे दिल्लीमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतील.

त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. न्या. एम.आर. शाह यांच्या पीठाने सांगितले, ‘आमच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची ज्यांची जबाबदारी असते, तेच उल्लंघन करतात. त्यामुळे जनतेकडून काय अपेक्षा करावी. प्रत्येक वेळी निवडणुका जिंकल्यानंतर राजकीय पक्षाद्वारे फटाके फोडले जातात. हजारवेळेस असे होते.’

फटाक्यांच्या विक्रीवर पूर्ण बंदी घालण्याच्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने विशेषतः दिवाळीच्या दिवशी फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी अनेक आदेश जारी केले. परंतु त्यांचे प्रभावीपणे पालन केले जात नाही. याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायण यांनी मंगळवारी सुनावणीदरम्यान हा मुद्दा उपस्थित केला.

‘न्यायालयाने फटाक्यांची ऑनलाइन विक्री, उत्पादन, परवाना आणि लेबलिंग इत्यादी मुद्यांवर आदेश दिले. पण सरकारने दखल घेतली नाही. कोर्टामध्ये तीन अवमान याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यावर न्यायालयाने लक्ष द्यावे. यावर जस्टिस शाह म्हणाले, सध्या सर्रास आमच्या आदेशाचे उल्लंघन होत असते. प्रत्येक धार्मिक आयोजन, लग्न आणि निवडणूका जिंकल्यानंतर फटाक्याची लड पेटवली जाते. त्यामुळे सर्वात जास्त प्रदूषण होते’ असे वकील शंकरनारायण यांनी कोर्टासमोर नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!