Share

‘सध्या भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा करू नका’, राज ठाकरेंच्या पक्षनेत्यांना सुचना

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्यास मनसे नेते इच्छुक असल्याची चर्चा आहे. भाजपा सोबत युती करायची किंवा नाही याबाबत पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे पुणे मनसे पदाधिकारी काहीसे ‘वेट अँड वॉच’ मोडवरती असल्याचे समजते. दरम्यान, राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या नेत्यांना तुर्तास भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा करु नका, अशी सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यातील मनसे-भाजप युतीचा मुद्दा रेंगाळत राहणार अशी शक्यता आहे.

पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे गेल्या दोन महिन्यांपासून पुणे दौरा करत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरू आहे. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने मनपा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला होता. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी ही बाब राज ठाकरे यांच्या कानावरही घातली होती. परंतु, राज ठाकरे सध्या सावधगिरीची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. कदाचित पुणे मनपा मनसे स्वबळावर लढेल आणि निकालानंतर राजकीय समीकरणे पाहून युती केली जाईल असा अंदाज आहे.

दरम्यान, पुणे मनसेचे अध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी देखील भाजप-मनसे युती होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले होते. ते म्हणाले की, ‘मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग जाहीर झाल्यामुळे आम्हाला जड जाणार आहे. त्यामुळे भाजपसोबत युती झाली तर त्याचा फायदा होणार आहे. भाजपसोबत गेलो तर सत्तेत सहभागी होऊन शहराचा विकास करता येणार आहे, मात्र, भाजपसोबत युती करायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय हा राज ठाकरे घेणार आहेत. असे स्पष्ट मत वसंत मोरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी या संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!