🕒 1 min read
मुंबई: भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाने श्रीलंकेविरुद्धच्या संघातून वगळल्यानंतर त्याला धमकी देणाऱ्या पत्रकाराचे नाव सांगण्यास नकार दिला. संघाची घोषणा झाल्यानंतर जेव्हा साहाला श्रीलंकेसाठीच्या कसोटी संघातून वगळण्यात आले, तेव्हा एका “सन्मानित पत्रकाराने” त्याच्याशी मुलाखतीसाठी संपर्क कसा केला आणि संदेश लवकरच धमकीचे कसे झाले हे सांगण्यासाठी साहाने ट्विटरवर चॅटचे फोटो टाकले. ज्यात विशेष म्हणजे पत्रकाराचे नाव उघड केले नाही. आता त्याने ट्विट करत नाव सांगणार नसल्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे.
साहाने पुन्हा ट्विट करत सांगितले “मी दुखावलो आणि नाराज झालो होतो. अशा प्रकारची वागणूक सहन करू नये असे मला वाटले आणि अशा प्रकारच्या गुंडगिरीतून कोणीही जाऊ नये असे मला वाटत होते. मी ठरवले की मी चॅट लोकांसमोर उघड करीन, पण त्याचे/तिचे नाव नाही. माझ्या स्वभावात कोणाचेही करिअर धोक्यात आणणे किंवा संपवणे नाहीये. त्याच्या /तिच्या कुटुंबाचे विचार करत मी नाव उघड करत नाहीये. पण असे पून्हा झाले तर मी शांत बसणार नाही. माझे समर्थन केलेल्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो.
3/3- I thank each and everyone who has shown support and extended their willingness to help. My gratitude.
— Wriddhiman Saha (@Wriddhipops) February 22, 2022
साहासोबत झालेल्या घटनेनंतर अनेक चाहते आणि वीरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री सारख्या माजी खेळाडूंनी बीसीसीआयला कारवाईची मागणी केली होती. बीसीसीआईने या प्रकरणी कारवाईचे साहाने प्रकरण न वाढवत नाव सांगण्यास नकार दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बडे दिल वाला! गंभीर आजाराशी लढा देणाऱ्या नवोदित खेळाडूसाठी केएल राहुल सरसावला
- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सातव्यांदा संसद रत्न पुरस्कार जाहीर
- राजकारणातील दुर्मिळ चित्र! युपीतल्या रणधुमाळीत प्रियंका गांधी आणि भाजप समर्थक एकत्र
- ‘परवा मला एका भिकाऱ्याने नरेंद्र मोदींचा राजीनामा मागितला’ – नाना पटोले
- दिशा सालियनच्या मृत्यूबाबत सात मार्चनंतर सत्य बाहेर येईल – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
