🕒 1 min read
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडले. दरम्यान चौथ्या टप्प्यातील प्रचार काल सोमवारी संध्याकाळी संपला. राजकीय दिग्गज रिंगणात आहेत. आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरूच आहे.
यादरम्यान हरदोई जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी माधौगंजमध्ये रोड शो केला. यादरम्यान त्यांचा ताफा मल्लावाँ चौकात पोहोचला असता भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला.
काँग्रेसने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात दावा केला आहे की भाजपच्या रॅलीतून परतलेल्या लोकांनी पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना काँग्रेसचे घोषणापत्र मागितले. यावेळी त्यांनी प्रियांका गांधींसोबत सेल्फी देखील क्लिक केले. राजकारणातील हे दुर्मिळ चित्र असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘परवा मला एका भिकाऱ्याने नरेंद्र मोदींचा राजीनामा मागितला’ – नाना पटोले
-
दिशा सालियनच्या मृत्यूबाबत सात मार्चनंतर सत्य बाहेर येईल – चंद्रकांत पाटील
-
“मुख्यमंत्री घरातल्या घरात गारठले”; अतुल भातखळकर यांची खोचक टीका
-
‘महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करण्यासाठी आम्ही सगळे जेलमध्ये जायला तयार’ – किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
