नागपुर: देशात परिवर्तन हवं असेल तर कॉंग्रेस हा मूळ पक्ष आहे, त्यामुळे आम्ही कॉंग्रेस सोबत असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले होते. तसेच त्यांची भेट होऊ शकली नाही म्हणून मी स्वतः त्यांची भेट घेणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सांगितलं. त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.
यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपने नांगपूरकरांना आर्थिक बोजाखाली टाकायचं काम केलं आहे, असा आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे. तसेच एसटी कामगारांचा लढा उचकावून मध्येच साथ सोडून देण्याचं काम देखील भाजपने केलं आहे, असंही पटोले यावेळी म्हणाले. एसटी कामगारांच्या परिवाराची वाईट अवस्था आहे, यावर सकारात्मक तोडगा काढला पाहिजे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना केली असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:
दिशा सालियनच्या मृत्यूबाबत सात मार्चनंतर सत्य बाहेर येईल – चंद्रकांत पाटील
“मुख्यमंत्री घरातल्या घरात गारठले”; अतुल भातखळकर यांची खोचक टीका
‘महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करण्यासाठी आम्ही सगळे जेलमध्ये जायला तयार’ – किरीट सोमय्या
विलिनीकरणावर अद्याप निर्णय नाही; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

