🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) स्टार कुस्तीपटू विनेश फोगटला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान, नियमांचे उल्लंघन केल्याने तिला तात्पुरते निलंबित केले आहे.
टोकियो गेम्सच्या उपांत्यपूर्व फेरीत बाद झालेल्या विनेशला नोटीसला उत्तर देण्यासाठी 16 ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आले आल्याचे कळते. यामध्ये अनुशासनाचे तीन आरोप लावण्यात आले आहेत. विनेशला क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा दावेदार मानले जात होते, पण बेलारूसच्या व्हेनेसाने तिला बाद केले.
प्रशिक्षक वोलर इकोससह हंगेरीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विनेशने तेथून थेट टोकियोला उड्डाण केले होते, जिथे तिने स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये राहण्यास आणि भारतीय संघाच्या इतर सदस्यांसह प्रशिक्षणाला नकार दिला. तिने भारतीय संघाचे अधिकृत प्रायोजक शिव नरेशचा पोशाख परिधान करण्यास नकार देत तिने नायकी कपडे परिधान केले होते.
डब्ल्यूएफआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “ही अनुशासनहीनता आहे. तिला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे आणि कुस्तीशी संबंधित सर्व उपक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. ती उत्तर देईपर्यंत कोणत्याही राष्ट्रीय किंवा इतर देशांतर्गत स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही आणि WFI अंतिम निर्णय घेईल.
टोकियोमधील अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, विनेशला तिच्या भारतीय संघातील खेळाडू सोनम, अंशु मलिक आणि सीमा बिस्ला यांच्या जवळ एक खोली देण्यात आली तेव्हा तिने गोंधळ घातला आणि सांगितले की हे कुस्तीपटू भारतात असल्याने तिला कोरोनाची लागण होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
- भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मोईन अलीचे संघात पुनरागमन
- महाराष्ट्रात आज ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर…
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
