मुंबई : महाराष्ट्रात आज 5,609 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 720 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 59 हजार 676 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.8टक्के आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 99,05, 096 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,63, 442 (12.75 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,13,437 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 860 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर देशातील आकडेवारी पाहता गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या 28,208 रुग्णांची भर पडली असून 373 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
तर गेल्या 24 तासात 41,511 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल एकाच दिवशी 13,680 सक्रिय रुग्णसंख्या कमी झाली आहे. या आधी 15 मार्चला 24,492 रुग्णसंख्येची नोंद झाली होती. दरम्यान राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांचे प्रमाण हे ३० हजारांहून अधिक झाल्यास तातडीने कडक लॉकडाऊन लावण्यात येईल असं म्हटलं आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजन उपलब्धतेचा विचार करून साधारणपणे ३० हजार रुग्णसंख्या झाल्यास करोना आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ कडक टाळेबंदी जाहीर केली पाहिजे, अशी भूमिकाच कुंटे यांनी मांडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
- नांदेड विभागातून तीनशेवी किसान रेल्वे सुसाट; महसूलात कोटींनी वाढ!
- मंत्रिमंडळ “खो खो” आणि अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळताय, भाजपचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

