मुंबई : इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत झाला. अखेरच्या दिवशी भारताला १५७ धावांची गरज होती. मात्र अखेरच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने एकाही चेंडुचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे पावसामुळे विजयाने भारताला हुलकावणी दिली.
यादरम्यान भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी लंडन मध्ये पोहोचला आहे. यादरम्यान भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी त्यांचा आघाडीचा फिरकीपटू मोईन अलीला संघात परत बोलावले आहे. या मालिकेपुर्वी इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलु खेळाडू बेन स्टोक्सने माघार घेतली होती. त्यामुळे संघात अष्टपैलु खेळाडूची कमतरता भासत होती. यामुळे संघाने मोईन अलीचा दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात समावेश केला आहे.
Welcome back, Mo! ????
???????????????????????????? #ENGvIND ????????
— England Cricket (@englandcricket) August 10, 2021
मोईन अली सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ‘द हंड्रेड’ या स्पर्धेत बर्मिंघम फिनिक्सकडून खेळत आहे. नुकतीच त्याने २८ चेंडुत ५९ धावांची वेगवान खेळी केली. या संघाचे नेतृत्व करताना त्याने चांगली कामगिरी करत गुणतालीकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. मोईन अलीने अखेरची कसोटी सामना भारताविरुद्ध चेन्नई येथे खेळला होता. या सामन्यात मोईन अलीने ८ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या
- पहिली कसोटी पावसामुळे अनिर्णीत; लॉर्ड्सवरील हवामानाविषयी मोठं अपडेट आलं समोर
- महाराष्ट्रात आज ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर…
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार


