🕒 1 min read
मुंबई : घरगुती गॅस सिलेंडर महागला असून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. फक्त इतकेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात नाना पटोले यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘रशियाकडून बाजारदरापेक्षा ३५ डॉलरच्या डिस्काऊंटने स्वस्त पेट्रोल डिझेल खरेदी करायचे आणि देशवासियांना आठ रुपये महागाने विकायचे! व्वा रे रक्तपिपासू व्यापारी मोदी सरकार’, असे पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, यापूर्वी ‘कच्च्या तेलाच्या किंमतीत २६ टक्क्यांनी घट, तरीही आज पेट्रोलच्या दरात ८० पैशांची, तर डिझेलच्या दरात ७० पैशांची वाढ. आठवड्याभरात इंधनात ४.८० रुपयांची दरवाढ. वारे रे पाकिटमार मोदी सरकार’, असे म्हणत नाना पटोलेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
महत्वाच्या बातम्या
- “…त्या पक्षात जातीवाद असूच शकत नाही”, राजे ठाकरेंच्या टीकेवर रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर
- PAK vs AUS: बाबरचे रेकॉर्ड मेकिंग शतक; कोहलीही करू शकला नाही ‘अशी’ कामगिरी!
- Women’s World Cup Final : अजिंक्य ऑस्ट्रेलिया..! इंग्लंडला धूळ चारत कागांरूंची विक्रमी जगज्जेतेपदावर मोहोर
- राज ठाकरेंच्या कालच्या भाषणातून बाळासाहेबांची आठवण झाली – चंद्रकांत पाटील
- बाहुबली’ फेम राणा दग्गुबातीच्या चाहत्यांना आनंदाची बातमी! लवकरचं होणार बाबा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
