Share

चिंताजनक! कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ

Published On: 

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा कहर वाढतच चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयांने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढली झाली असून मंगळवार(२४ ऑगस्ट)च्या तुलनेत बुधवारी(२५ ऑगस्ट)नऊ हजार रुग्णांची अतिरिक्त वाढ झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ४६ हजार १६४ रुग्णांची भर पडली असून ६०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ३४ हजार १५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मंगळवारी देशात ३७,५९३ नव्या रुग्णांची भर पडली आणि ६४८ जणांचा मृत्यू झाला होता.

सध्या देशात एकूण कोरोनामुक्त रुग्ण ३ कोटी १७ लाख ८८ हजार ४४० असून ३ लाख ३३ हजार ७२५ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच ४ लाख ३६ हजार ३६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा १.३४ आहे तर रिकव्हरी दर हा ९७.६८ टक्के आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ही ०.९८ टक्के इतकी आहे.

दरम्यान, राज्यात बुधवारी 216 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. तब्बल ३५ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ५० हजार १८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त १२,६७३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण १५ जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १०० च्या आत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!