मुंबई : नारायण राणे यांच्यावर राज्य सरकारकडून करण्यात आलेली अटकेची कारवाई आणि त्यानंतर मिळालेला जामीन यामुळे भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलंच आक्रमक झाले आहेत. आता भाजपनेही शिवसेनेला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उत्तर प्रदेशामधील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आली असतनाच आता भाजपाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच सामनाच्या संपादिका आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष वरुण देसाईंविरोधात वेगवेगळ्या कारणांसाठी तक्रारी दाखल केल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी राणेंनी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून राणे यांच्याविरुध्द जातीय तेढ निर्माण करणे, द्वेष निर्माण करणे अशा विविध कलमांन्वये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच साबर पोलीस स्थानकामध्ये आता उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि वरुन देसाईंविरोधात तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिलाय.
भाजपाच्या वतीने तीन जणांनी या तक्रारी दाखल केल्या आहेत. पाहिली तक्रार ऋषिकेश अहेर यांनी मुख्यमंत्री आणि वरुण देसाईंविरोधात दाखल केलीय. देसाई यांनी मुंबईमधील राणेंच्या घऱाबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याचं फेसबुकवरुन लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आल्याने आयपीसी कलम १५३ (अ), १०७ आणि २१२ सहीत सायबर गुन्ह्यांखाली तक्रार दाखल करुन घेण्यात यावी असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपच ठरलं ; मुख्यमंत्र्यांना लिहिणार ‘या’ आशयाचे ७५ हजार पत्र
- ‘सख्खा भाऊ योगी, शहांबद्दल असं बोलत नाही’; राणेंकडून मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या वक्तव्याचे दाखले
- राणे प्रकरणातही शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; ‘विरोधात’ही दानवे-खैरे यांची तोंडे ‘विरुद्ध’ दिशेला!
- ‘देवेंद्र फडणवीस मला मार्गदर्शन करतात ते मी स्वीकारेल’
- अफगाणी नागरिकांना यापुढे देश सोडून जाण्याची परवानगी देणार नाही – तालिबान


