Share

‘मर्द को दर्द नहीं होता’, उपचारानंतर अभिषेकने शेअर केला फोटो

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला दुखापत  झाल्याने  उपचारासाठी त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन, वडील अभिनेते अमिताभ बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन रुग्णालयात त्याला पाहण्यासाठी पोहोचले होते. त्यानंतर त्याची शस्त्रक्रिया पार पडली असून नुकताच सोशल मिडीयावर त्याने एक फोटो पोस्ट केला आहे.

अभिषेक बच्चनचा गंभीर अपघात झाला. यानंतर त्याच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागली. दरम्यान, अभिषेकने इन्स्टाग्रामवर सर्जरीनंतरचा एक फोटो शेअर केला आहे. यात त्याच्या उजव्या हातावर प्लास्टर दिसत आहे. तसेच त्याने अपघात घडण्याचे कारण देखील सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/CTAc-JZpjI_/?utm_source=ig_web_copy_link

अभिषेक पोस्टमध्ये तो लिहितो की, ‘गेल्या बुधवारी चेन्नईत माझ्या एका नव्या सिनेमाच्या सेटवर एक भयावह अपघात झाला. यात माझा उजवा हात फ्रॅक्चर झाला. हात ठीक करायचा तर सर्जरी करणं गरजेचं होतं. यामुळे ताबडतोब मुंबईला याव लागल.’

‘आता सर्जरी झाली असून मी बरा आहे. आता मी पुन्हा चेन्नईला शूटींगसाठी परतलो आहे. ते म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन आणि माझे पापा म्हणाले होते त्यानुसार, मर्द को दर्द नहीं होता…. अरे… अरे… थोड्या वेदना होत आहेत….’ असे म्हणत त्याने अमिताभ बच्चन यांचा डायलॉग गमतीशीर अंदाजात म्हणटला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अभिषेक  त्याचा ‘द बिग बुल’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता लवकरच अभिषेक ‘बॉब बिस्वास’ या सिनेमात दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!