Share

टी -20 विश्वचषकापूर्वी भारतासाठी चिंताजनक बातमी; ‘हा’ अष्टपैलू खेळाडू अजूनही अनफिट 

Published On: 

नवी दिल्ली : आयपीएल 2021 मध्ये, जेव्हा मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे संघ गुरुवारी अबुधाबीमध्ये उतरले तेव्हा दोन विशेष गोष्टी दिसल्या. पहिली गोष्ट लाखो भारतीय आणि मुंबई इंडियन्स चाहत्यांसाठी आनंदाची बातमी होती कारण मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा तंदुरुस्त झाल्यानंतर मैदानात परतला आहे. पण यासोबत एक चिंताजनक बातमी देखील समोर आली, जी आयपीएल मधील मुंबई इंडियन्ससाठी त्रासदायक बातमी आहेच, पण भारतीय क्रिकेट संघासाठी चिंताजनक बातमी आहे.

टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडून खेळणारा हा भारतीय अष्टपैलू गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा मैदानात उतरला नाही. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माही दुखापतीमुळे खेळला नाही पण गुरुवारी केकेआरविरुद्ध तो तंदुरुस्त झाला पण हार्दिक पंड्याचे नाव पुन्हा संघातून गायब झाले.

शेवटच्या सामन्यात असे सांगण्यात आले होते की, ‘हार्दिक पंड्याला किरकोळ दुखापत झाली आहे जी लवकरच बरा होईल पण त्याचे नाव गुरुवारीही संघात समाविष्ट करण्यात आले नाही. पांड्याच्या अनुपस्थितीमुळे मुंबई इंडियन्सला किती त्रास होईल हे सांगणे कठीण आहे, पण पंड्याची अनुपस्थिती कायम राहिल्यास टीम इंडियाला पुढील महिन्यात खेळल्या जाणाऱ्या टी -20 विश्वचषकात धक्का बसू शकतो हे निश्चित आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!