Share

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लातूर जिल्हा बँक देणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

Published On: 

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या मुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सध्या शेतकरी संकटात असताना बँकेच्या वतीने घेण्यात आलेला हा निर्णय नक्कीच दिलासादाय आहे. या संदर्भात लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी बँकेचे अभिनंदन केले आहे.

या संदर्भात आमदार धीरज देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या ३८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी बांधवांना पिक कर्जासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, व्हाईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ आणि संचालक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन! या निर्णयाचा अनेक शेतकरी बांधवाना मोठा लाभ होणार आहे.’

गेल्या काही दिवसात लातूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिक निघून गेले आहे. तसेच लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. जिल्हा बँकेच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना लाभ हाईल, अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!