मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांनतर राज्यात खळबळ माजली होती. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार होते. तर दुसरीकडे सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली होती या नोटीसीमधून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली होती.
यानंतर माझ्या दौऱ्यामध्ये ठाकरे सरकारकडून खोडा घातला जातोय, असा आरोप खुद्द सोमय्या यांनी केला होता. मला गणेश विसर्जनासाठी जाऊ दिले जात नाहीये. माझ्या घराबाहेर डझनभर पोलीस पाठवण्यात आले आहेत, असं सोमय्या यांनी म्हटले होते. तुम्ही मला किती दिवस पोलीस ठाण्यात डांबून ठेवणार ? मी तुमचे घोटाळे बाहेर काढल्या शिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिला होता.
दरम्यान या सर्व प्रकरणावर किरीट सोमय्या चांगलेच आक्रमक झाले असून ते उद्या मुंबई पोलिसांविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. मुलुंड येथील राहत्या घरी कोंडण्याचा तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर प्रवासाला आडकाठी केल्याप्रकरणी ते हि तक्रार उद्या दुपारी २ वाजता दाखल करणार आहेत.
मुंबई पोलिसांनी १९ सप्टेंबरला मला सोमैयांना घर/कार्यालयात कोंडून ठेवले व CSMT स्टेशनच्या बाहेर अडथळा निर्माण केला, या विरोधात मी उद्या 4 वाजता पोलीस तक्रार प्राधिकरण येथे उद्या दु.२ वा. तक्रार दाखल करणार @BJP4Maharashtra pic.twitter.com/qeK6xB8In9
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 23, 2021
तसेच किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा 28 सप्टेंबरला कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. 27 तारखेला मुंबईहून निघून 28 तारखेला कोल्हापुरला पोहोचणार आहेत. तिथे पोहोचल्यानंतर कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लातूर जिल्हा बँक देणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
- ‘मोदी सरकारचे ओबीसींवरचं प्रेम बेगडी’, प्रा. हरी नरकेंचा आरोप
- ‘तुला काय फरक पडतोयं’; सामन्यापूर्वी केकेआरचा रोहितला न खेळण्याचा सल्ला
- काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद रणपिसे यांचे पुण्यात निधन
- जॅकी उर्फ ‘जग्गुदादा’ची टपोरी भाषा ऐकायला मिळणार ; ‘बिग बी’सोबत चाहत्यांमध्ये उत्सुकता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

