नवी दिल्ली : लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांसाठी ‘खेलो इंडिया’ अंतर्गत १० इनडोअर व आऊटडोअर स्टेडियम तसेच क्रीडा केंद्र उभारण्याची मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन दिले. या मागणीवर केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचे आमदार निलंगेकर यांनी सांगितले आहे.
लातूर जिल्ह्यातील खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि साहित्य मिळत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. क्षमता असूनही अनेक खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेस मुकावे लागत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘खेलो इंडिया’ योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही मागणी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. मोदींनी या योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी खेळांचे केंद्र तयार करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले असल्याचे ते म्हणाले.
या अंतर्गत लातूर जिल्ह्यातही बॉक्सिंग, कुस्ती आणि बॅडमिंटन या तिन्ही खेळांची केंद्रे उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र या बाबतीत अजुन सुद्धा प्रगती होणे आवश्यक असल्याचे अनुराग ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिले, असल्याचे आमदार निलंगेकर यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बेधूंद झालेल्या ‘धमेंद्र’ला तनुजाने दिला होता चांगलाच ‘चोप’
- ‘मोदी सरकारचे ओबीसींवरचं प्रेम बेगडी’, प्रा. हरी नरकेंचा आरोप
- ‘तुला काय फरक पडतोयं’; सामन्यापूर्वी केकेआरचा रोहितला न खेळण्याचा सल्ला
- काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद रणपिसे यांचे पुण्यात निधन
- जॅकी उर्फ ‘जग्गुदादा’ची टपोरी भाषा ऐकायला मिळणार ; ‘बिग बी’सोबत चाहत्यांमध्ये उत्सुकता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

