Share

आपल्याकडे बाकी सगळं ट्रेंड होत असतं पण शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र..; हेमंत ढोमेची हळहळ

Published On: 

मुंबई : देशातील हंगामी महत्वाचे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. दरम्यान मागच्या आठवड्यात सोयाबीनची आयात केल्याने देशातील सोयाबीनचा #soyabean दर अचानक तीन ते चार हजार रुपयांनी घसरले आहेत. सोयबीन काढणाची हंगाम सुरू असताना हे दर पडल्याने सरकार विरोधात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मिळून सोशल मीडीयावर ट्रेंड सूरू केला आहे. याला हजारो शेतकऱ्यांनी प्रतिसाद आहे. अभिनेता हेमंत ढोमेने देखील हा हॅशटॅग वापरत सोयाबीन शेतकऱ्यांबाबत हळहळ व्यक्त केली आहे.

आपल्याकडे बाकी सगळं ट्रेंड होत असतं पण शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र तिथल्या तिथेच असतात, असं म्हणत हेमंतने सोयाबीन शेतकऱ्यांबाबात हळहळ व्यक्त केली आहे.

(#soyabean) मागच्या चार दिवसांपुर्वी १० हजार प्रती क्विंटल सोयाबीनचा दर होता. काल त्यात मोठी घसरण होवून प्रती क्विंटल ५५०० ते ५७०० दर झाला आहे. तब्बल ४० ते ५० % दर पडले आहेत. मागच्या आठवड्यात १५ लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात केले आहे. याला महाराष्ट्र सरकारने लेखी विरोध केला.

दरम्यान, खाद्यतेल आयात शुल्क कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोयापेंड १२ लाख टन आयात करण्यात आली. या कारणांमुळे सोयाबीनचे दर गडगडले आहेत. सोयाबीन दराच्या घरसणीवरुन सोशल मीडियावर नेटकरी तसेच राजकारणी केंद्र सरकारवर ताशेरे ओढत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!