Share

चिंताजनक ! अहमदाबादमध्ये १३ वर्षाच्या मुलाला ब्लॅक फंगसची लागण

Published On: 

अहमदाबाद : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशभरात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता देशात म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस)च्या आजाराची लागण आता लहान मुलांपर्यंतही पोहोचली आहे. अहमदाबादमध्ये एका 13 वर्षाच्या मुलाला ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. लहान मुलाला ब्लॅक फंगसची लागण होण्याची देशातील ही पहिलीच घटना असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या मुलाच्या आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. तर हा मुलगा कोरोनातून बरा झाला होता. मात्र दीड महिन्यानंतर त्याच्यात ब्लॅक फंगसचे लक्षणे दिसून आली. डॉक्टरांनी त्याची टेस्ट केली असता तो ब्लॅक फंगस पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे त्याचं आज तातडीने ऑपरेशन करण्यात आलं. हा मुलगा सुरक्षित असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.

अहमदाबादमधील या मुलाचा ब्लॅक फंगस रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला अहमदाबादच्या ॲपल चिल्ड्रन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या मुलाला यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या आईलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. ब्लॅक फंगस वगळता या मुलाला कोणताही आजार नसल्याचं सांगण्यात आले आहे.

दरम्यान, हा आजार झालेल्या रुग्णांना एम्फोटेरीसीन बी चे तब्बल चाळीस ते पन्नास इंजेक्शन द्यावे लागत आहेत. एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन हे प्रामुख्याने म्युकरमायकोसीसचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरलं जातं, पण सध्या हे इंजेक्शन कुठेच मिळत नाही, अशी तक्रार केली जात आहे. याचाच अर्थ देशभरामध्ये या इंजेक्शनची कमतरता जाणवत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!