Share

मराठवाड्याच्या प्रगतीसाठी आपली क्षमता ओळखा, कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले यांचे मत

Published On: 

औरंगाबाद : मराठवाड्याच्या विकासासाठी मराठवाड्याच्या क्षमता ओळखण्याची गरज असल्याचे मत कुलगुरु डॉ.  येवले यांनी  व्यक्त केले. कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले यांनी सीपीपी ए अंतर्गत झालेल्या चर्चासत्रंवर आधारित संपादीत पुस्तकांचे अनावरण करून प्रकाशन देखील केले. एका उद्घाटन सोहळ्यानिमित्त कुलगुरु मार्गदर्शन करत होते.

आपल्या मराठवाड्याच्या विकास विषयक क्षमतेबाबत आणि त्यांच्याशी निगडीत समस्यांबाबत वस्तुस्थितीची मांडणी देखील केली. मराठवाड्यातील ७५ टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. त्याचा परिणाम दरडोई उत्पन्नावर होतो. तसेच जीवनमानावरही होत आहे, ही वस्तुस्थिती असल्याचेही मत देखील कुलगुरुंनी मांडले. या उद्घाटन सत्राकरिता केंद्राच्या सल्लागार समितीचे सदस्य प्रा. सर्जेराव ठोंबरे, डॉ. एस. टी. सांगळे, प्रा. स्मिता अवचार, प्रा. शूजा शाकीर, प्रा. अशोक पवार आदींची उपस्थित होती.

याशिवाय प्रा. सी. एन. कोकाटे, प्रा. कृतिका खंदारे, प्रा. पांडुरंग कल्याणकर, प्रा. अपर्णा कोत्तापल्ले, प्रा. कुमार, प्रा. बाबर यांची उद्घाटन सत्राला उपस्थिती होती. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. शाकीर यांनी केले. तर त्यानंतरच्या शोधनिबंध वाचन सत्रांचे सूत्रसंचालन डॉ. कृतिका खंदारे यांनी केले. ‘सेंटर विथ पोटेन्शियल फोर एक्सैलेन्स’च्या मुख्य समन्वयक डॉ. धनश्री महाजन यांनी केंद्राच्या वाटचालीबाबत उद्घाटनाच्या सत्रात माहिती दिली आहे.  या कार्यक्रमात शनिवारी जिल्हा नियोजनाच्या विविध आंतरविद्याशाखीय पैलूंवर चर्चा देखील केली. समारोप समारंभासाठी मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या संचालक प्रा. मनिषा कारणे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी भूषवले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ. जे. जी. साबळे, रामेश्वर तांबे, रवींद्र कदम यांनी परिश्रम घेतले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!