मुंबई : मजुरांसाठी सोडण्यात आलेल्या रेल्वेसाठी शुल्क आकारले जात असल्याचा आरोप काहीजणांनी केला होता. यावर रेल्वेने स्पष्टीकरणही दिले होते. कोरोनामुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी रेल्वे कोणतेच शुल्क आकारात नसल्याचं स्पष्टीकरण दिले होते. तर तिकीट दरात ८५ टक्के सलवत दिली जात असल्याची माहिती दिली गेली. उर्वरित १५ टक्के रक्कमदेखील संबंधित राज्य सरकारांकडून घेत असल्याचं रेल्वेनं सांगितलं होत. मात्र रेल्वे कडून अद्याप कोणताच अधिकृत आदेश आला नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
केंद्रातल्या रेल्वे खात्याच्या माध्यमातून तिकिटांवर ८५ टक्क्यांची सवलत परप्रांतीय कामगारांना देण्यात आली आहे. पण आजच्या तारखेपर्यंत असे कोणतेही आदेश रेल्वे विभागानं काढलेले नाहीत. त्यामुळे आज जे सर्व परप्रांतीय आपापल्या राज्यात चालले आहेत, त्यांना स्वत:च्या खिशातले पैसे खर्चून तिकीट काढावं लागतं आहे. आज परप्रांतीय कामगारांची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यांच्याकडे पैसे नाहीत,’ असं देशमुख म्हणाले.
@RailMinIndia म्हणतंय की परप्रांतीय मजूरांकडून प्रवासाकरीता तिकीट आकारलं जाणार नाही कारण केंद्र ८५% खर्च उचलेल पण महिनाभर लॉक डाऊन मुळे काही न कमावलेल्या मज़ूरांना आता ही पूर्ण प्रवास भाडं भरूनच तिकीट घ्यावं लागतंय. गरीबांबद्दल रेल्वे प्रशासनाने मानवतेने विचार करावा हि विनंती.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 6, 2020
दरम्यान एएनआय वृत्तसंस्थेनं रेल्वेतील सूत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं होत. ‘भारतीय रेल्वेकडून श्रमिक गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगची पूर्ण काळजी घेतली जात आहे. या गाड्या श्रमिकांना सोडून रिकाम्या परतत आहेत. परतत असताना त्या पूर्णपणे बंद असतात. रेल्वेकडून मजुरांना मोफत जेवण आणि पाण्याची बाटली दिली जाते,’ अशी माहिती देण्यात आली आहे.
आतापर्यंत देशातल्या विविध भागांमधून ३४ श्रमिक विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून रेल्वे सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत. हा कठीण काळात देशातल्या गरिबातल्या गरिब व्यक्तींचा प्रवास सुरक्षित आणि सोयीस्कर व्हावा यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत, असं रेल्वेतल्या सूत्रांनी सांगितलं होत.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी : विशाखापट्टणम येथे वायू गळती, 8 जण दगावले तर 200 जणांची प्रकृती गंभीर
नुसत्या बोंबा मारण्यापेक्षा चला एकत्र केंद्राकडे जाऊ, आयएफएससी मुंबईत झाले पाहिजे म्हणून सांगू या!
अमित ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन; काकांकडून पुतण्याला महत्त्वाचं आश्वासन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

