Share

अमित ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन; काकांकडून पुतण्याला महत्त्वाचं आश्वासन

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा प्रश्नाबाबत अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केली आहे. एमपीएससी समनव्य समिती महाराष्ट्र राज्य यांनी ट्विट करुन यासंबंधित माहिती दिली आहे.

एमपीएससी समनव्य समितीने महाराष्ट्र राज्यानं ट्विट केले आहे की, अमित ठाकरे यांनी आमच्याशी फोन वरून चर्चा करून आमची विचारपूस केली. यानंतर उद्धव ठाकरे यांना फोन करुन बसेसची सोय करून विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात यावे अशी विनंती केली.

या विद्यार्थ्यांची तात्काळ आपापल्या घरी जाण्याची व्यवस्था करण्यात यावी, बसची सोय करण्यात यावी, अशी विनंती अमित ठाकरे यांनी केली. दोन दिवसांत या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अमित ठाकरे यांना दिलं.

‘उपचारादरम्यान अनेक नागरिकांना आमच्या रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा असे सांगण्यात येत आहे. अशावेळी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मनस्थिती बिकट असते. या परिस्थितीत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सर्व रुग्णालयाची माहिती अॅपवर उपलब्ध करावी,’ असं याआधी अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णांच्या अडचणींची माहिती देणारं पत्र रविवारी लिहिलं होतं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!