🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारने मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात मधील गांधीनगर येथे हे कार्यालय असणार आहे. एकाच ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय कारभार करणे सोपे होईल यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. यावर आता राज्यातील काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.
याचाच धागा पकडत आयएफएससी गांधीनगरला करण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला होता असा आरोप भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. आ. शेलार यांनी याबाबत ट्विट करत भाष्य केलं आहे.
आयएफएससी मुंबईला व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच एकमेव प्रस्ताव पाठवला, तो आजही केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळे नुसत्या बोंबा मारण्यापेक्षा चला आता महाराष्ट्राने एकत्रपणे केंद्राकडे… आयएफएससी मुंबईत झाले पाहिजे म्हणून सांगू या!(2/2)
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 6, 2020
ट्विटमध्ये शेलार म्हणतात, ‘संसदेतील तत्कालीन अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांचे भाषण स्पष्ट करते आहे की, आयएफएससी गांधीनगरला करण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला. ते मुंबईला व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला होता असं शेलार यांनी सांगितले आहे.
पुन्हा एकदा हे संसदेतील तत्कालीन अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांचे भाषण स्पष्ट करते आहे की,आयएफएससी गांधीनगरला करण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला.ते मुंबईला व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला होता.(1/2) @BJP4Maharashtra pic.twitter.com/z41d2JKQub
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 6, 2020
दरम्यान, ‘आयएफएससी मुंबईला व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच एकमेव प्रस्ताव पाठवला, तो आजही केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळे नुसत्या बोंबा मारण्यापेक्षा महाराष्ट्राने एकत्रपणे केंद्राकडे जाऊन आयएफएससी मुंबईत झाले पाहिजे म्हणून सांगू या असं आवाहन देखील शेलार यांनी सरकारला केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
